Thursday, September 29, 2016

Credible

आजचा शब्द आहे credible (क्रेडिबल).

नवीन post करण्यासाठी आम्हाला एक काहीतरी trigger लागतो,कुठेतरी एखादा शब्द नजरेत येतो आणि वाटतं की हा शब्द आज सांगायचा - आणि तेव्हा कुठे post लिहायला घेतला जातो.

आज भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीर मध्ये दहशतवाद्यांविरुद्ध लष्करी कारवाई केली. त्या बातमी मध्ये credible चा उल्लेख झाला आहे तो असा -
"Based on receiving specific and credible inputs about some terrorist teams positioned themselves along Line of Control to carryout infiltration, the Indian Army conducted surgical strikes to pre-empt infiltration by terrorist".

अशा प्रकारच्या मराठी बातम्यांमध्ये एक शब्द नेहमी पहायला मिळतो - खात्रीलायक किंवा विश्वसनीय. बरोबर ना? :)
या बातमीत सुद्धा या शब्दांचा वापर झालाय तो credible च्या रूपाने!

म्हणजे -
credible चा अर्थ खात्रीलायक, विश्वसनीय, विश्वासार्ह असा होतो.

अधिक माहिती:
आपण बऱ्याचदा believe हा शब्द वाचला असेल , त्याचा अर्थ "विश्वास ठेवणे" असा आहे. या शब्दाचं विशेषण रुप - believable - आणि credible हे समानार्थी शब्द आहेत.

Tuesday, September 27, 2016

Smirk

आजचा नवीन शब्द. :-)

तुम्हाला नवीन शब्द आणि त्याचा अर्थ सांगायला काय निमित्त मिळेल काही सांगता यायचं नाही ! आज काय तर - laptop किंवा PC वर chatting करताना जे notification येतात त्यावरून हा शब्द  सुचला ..

Chatting करताना आपण बऱ्याचदा smiley वापरतो, हो ना ? आपल्या whatsapp किंवा telegram ची  window बंद असेल आणि तेव्हा कोणी smiley पाठवली, तर notification मध्ये smiley दिसायच्या ऐवजी त्या smiley ने व्यक्त होणाऱ्या भावनांचं English मधलं वर्णन दिसतं.

:smirk:



 मी ज्या notification बद्ल बोलतोय त्या मध्ये :smirk: असं लिहून आलं होतं. डाव्या बाजूला जी image आहे तिचं वर्णन करणारा हा शब्द.

कधी कधी आपल्याला राग येतो, पण तो राग दाखवू पण शकत नाही आणि लपवायची इच्छा नसते. अशा बाबतीत smirk कामाला येतं. :-)

smirk म्हणजे असं हसू ज्याने रागाची अथवा एखादी गोष्ट न आवडल्याची भावना जाणवून येते . 
खूपच अवघड अर्थ वाटतोय का?
अगदीच आपल्या रोजच्या भाषेत सांगायचं तर - उसनं हसू  किंवा  कुत्सित हसू. 

समजलं ना?

-

काही suggestions/feedback असतील तर जरूर कळवा . आवडलं  असेल तर नक्की like आणि subscribe  करा. :-)

Saturday, September 24, 2016

Dear

Railway travel prices become dearer
"Railway travel prices become dearer"

Lunch करत असताना tv वर news आली . dearer चा अर्थ "आधीपेक्षा स्वस्त" किंवा "आधीपेक्षा महाग" या दोन्ही पैकी एक हे नक्की होतं , पण नक्की काय ते लक्षात नव्हतं. dear चा अर्थ स्वस्त असा असावा असं माझं मन म्हणत होतं - साहजिकच होतं म्हणा, एकतर railway चा प्रवास नेहमीचा आणि आवडता पण - म्हणून त्याची किंमत स्वस्त व्हावी असं मला वाटणं साहजिक होतं!
पण माझ्या इच्छेने थोडीना एखाद्या English शब्दाचा अर्थ बदलणार.. :-(

शेवटी व्हायचं तेच झालं, - ;-)
dear म्हणजे महाग.... स्वस्त नव्हे!
मग काय, तुम्हाला पण सांगावं म्हणलं. :-)

समानार्थी शब्द - Costly

Dear चा अजून एक वेगळा अर्थ होतो - तो म्हणजे "प्रिय"!  Generally हे वेगळं सांगायची गरज नाही, तरीपण माहीत असावं म्हणून सांगितलं. एकाच शब्दाचे जेव्हा असे एकदम वेगळे अर्थ असतात तेव्हा बाकीच्या वाक्यावरून त्याचा योग्य अर्थ लावावा.
उदा.
"Railway travel prices become dearer"
१. रेल्वे प्रवासाच्या किमती महाग झाल्या.  २. रेल्वे प्रवासाच्या किमती प्रिय झाल्या. - यापैकी अर्थातच पहिलं वाक्य अधिक योग्य वाटतं. म्हणून या वाक्यात dear चा अर्थ "महाग" असा घ्यावा.

Friday, September 23, 2016

Capsize

आज बोलता बोलता सहजच माझ्या मित्राने एक नवीन गोष्ट सांगितली. फक्त त्याच्यासाठी नवीन होती बरं ! तो म्हणाला – मला आज कळालं, उत्तर आणि दक्षिण अमेरिका एकमेकांना जोडलेले आहेत ! अशी कोणतीही नवीन (अजब) गोष्ट समजली कि कोणीसुद्धा आनंदी होतो, तसाच तोही झालेला दिसत होता. त्याचा उत्साह बघून मी पण त्याला मग ‘पनामा’ कालव्याबद्दल एक interesting माहिती सांगितली. पनामा कालवा उत्तर आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणाऱ्या जमिनीमध्ये आहे आणि या कालव्यामधून जाताना मोठं-मोठ्या बोटी पाण्याच्या एका पातळीवरून दुसऱ्या पातळीवर हलविल्या जातात. खतरनाक ना ???
तर हेच discussion  चालू असताना त्याने बोटींच्या धडाकेबद्दल काहीतरी सांगायला सुरुवात केली आणि मी म्हणालो, capsize झाली का बोट, धडक झाल्यानंतर ? त्याने पण लगेच विचारलं- capsize म्हणजे काय?

तर एवढं सगळं मी capsize  साठी सांगितलं… हुश्श !

Capsize म्हणजे अपघाताने (बोट किंवा इतर काहीपण) उलटणे. ज्याला बोली भाषेत बऱ्याच ठिकाणी बोटीने पलटी खाल्ली असं पण म्हणतात.

शेवटी आणखी एक माहिती –
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना turtle या शब्दाचा अर्थ नक्की माहित असेल. turtle म्हणजे कासव. पण जर turtle क्रियापद म्हणून वापरायचा ठरवला – तर त्याचाही अर्थ “अपघाताने (बोट किंवा इतर काहीपण) उलटणे” असाच होईल.
थोडक्यात सांगायचं तर turtle हा capsize चा समानार्थी शब्द आहे.

तुम्हाला या शब्दाबद्दल किंवा इतर कोणत्याही माहिती बद्दल शंका असेल तर comment करायला विसरू नका.
धन्यवाद.

Saturday, September 17, 2016

Complacent

काही दिवसांपूर्वी एक match पाहत होतो. भारताने विराट कोहली च्या नेतृत्वाखाली उत्तम (भारी :-) ) खेळ करून विजय मिळवला होता. नेहमीप्रमाणे presentation ceremony पार पडला. त्यावेळी विराट म्हणाला, “We  are happy with our performance today, but can not be complacent!”.

मला काही वाक्याचा अर्थ पूर्ण कळला नव्हता. कधी कधी एखादा-दुसरा शब्द माहीत नसला तरी चालतं, मात्र कधी कधी अर्थ लागत नाही. यावेळेस असंच झालं . Complacent चा अर्थ मला  शोधावा लागलाच …..

असो, प्रस्तावना पुरे!

Complacent  म्हणजे शब्दशः आत्मसंतुष्ट.
आणि विराट च्या वाक्याचा पूर्ण अर्थ असा-
आम्ही आमच्या आजच्या खेळाबाबतीत समाधानी आहोत, पण आम्हाला यावरच थांबून (संतुष्ट होवुन) चालणार नाही… (म्हणजेच यापुढे आजच्यापेक्षाही उत्तम खेळ करण्याचा आमचा प्रयत्न असावा !)

आता Complacent चा अर्थ समजला ना?

 

Learning English

About starting this blog

आमच्या group  ने recently एक “Vocabulary” नावाचा whatsapp group बनवला. उद्देश असा की आम्हा सगळ्या लोकांचा English वाचनाचा आवाका एकमेकांसोबत माहिती share करून वाढवावा. मग काही दिवसांनी लक्षात आलं की अर्थासोबतच जर त्या शब्दाचा उल्लेख कुठे आला, त्या शब्दाचा वापर कसा केला आहे वाक्यामध्ये –  ते जर सांगितलं तर तो शब्द दीर्घकाळ लक्षात राहील, English ऐवजी तीच गोष्ट जर बोलीभाषेत सांगितली तर मात्र विसरायला जागाच नाही.
  तोच प्रयत्न आता blog मार्फत सर्व मराठी भाषिकांसमोर ठेवत आहोत.

सुरुवातीला कदाचित तुम्ही शोधत असलेला शब्द मिळणार सुद्धा नाही . तसं झाल्यास आम्हाला e-mail करून किंवा contact form मधून तो शब्द सांगा, आम्ही लवकरात लवकर सोप्या भाषेत त्या शब्दाचा अर्थ या blog  द्वारे सांगू.

कधी कधी वाक्यात वापरलेल्या सगळ्या शब्दांचे अर्थ माहीत असतात , पण किचकट वाक्यरचनेमुळं वाक्याचा अर्थ लागत नाही. अशा English वाक्यरचना आम्हाला जरूर पाठवा, आम्ही आमच्या परीने त्यांचा अर्थ सांगायचा प्रयत्न करू.

आणि हो, suggestions, प्रतिक्रिया, चुका पाठवायला विसरू नका!

Happy English Learning. :-)