Lunch करत असताना tv वर news आली . dearer चा अर्थ "आधीपेक्षा स्वस्त" किंवा "आधीपेक्षा महाग" या दोन्ही पैकी एक हे नक्की होतं , पण नक्की काय ते लक्षात नव्हतं. dear चा अर्थ स्वस्त असा असावा असं माझं मन म्हणत होतं - साहजिकच होतं म्हणा, एकतर railway चा प्रवास नेहमीचा आणि आवडता पण - म्हणून त्याची किंमत स्वस्त व्हावी असं मला वाटणं साहजिक होतं!
पण माझ्या इच्छेने थोडीना एखाद्या English शब्दाचा अर्थ बदलणार.. :-(
शेवटी व्हायचं तेच झालं, - ;-)
dear म्हणजे महाग.... स्वस्त नव्हे!
मग काय, तुम्हाला पण सांगावं म्हणलं. :-)
समानार्थी शब्द - Costly
Dear
चा अजून एक वेगळा अर्थ होतो - तो म्हणजे "प्रिय"! Generally हे वेगळं
सांगायची गरज नाही, तरीपण माहीत असावं म्हणून सांगितलं. एकाच शब्दाचे
जेव्हा असे एकदम वेगळे अर्थ असतात तेव्हा बाकीच्या वाक्यावरून त्याचा योग्य
अर्थ लावावा.
उदा."Railway travel prices become dearer"
१. रेल्वे प्रवासाच्या किमती महाग झाल्या. २. रेल्वे प्रवासाच्या किमती प्रिय झाल्या. - यापैकी अर्थातच पहिलं वाक्य अधिक योग्य वाटतं. म्हणून या वाक्यात dear चा अर्थ "महाग" असा घ्यावा.

No comments:
Post a Comment